शोधा
पुण्याला वैशिष्ट ओळख देणाऱ्या सुंदर आणि भव्य वृक्षांकडे लक्ष द्या.


पुणे ट्री ऑफ द इयर · 2026
नामांकने ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत खुली आहेत.
आपल्या शहराचे सौंदर्य, जैवविविधता आणि नैसर्गिक वारसा यांना विशेष ओळख देणाऱ्या उल्लेखनीय वृक्षांचा शोध घ्या, त्यांची नोंद ठेवा आणि त्यांचा गौरव करा.
स्वागत
आपले रोजचे जगणे झाडांमुळे सुंदर होते. झाडांमुळे सावली-थंडावा मिळतो, जैवविविधतेला आश्रय मिळतो, कार्बन साठवला जातो, जमिनीचे रक्षण होते, पाणी मुरून भूजल पातळी वाढते आणि कित्येक पिढ्या निसर्गाशी जोडल्या जातात.
'पुणे ट्री ऑफ द इयर' द्वारे आम्ही तुम्हांला सभोवतालच्या झाडांकडे वेगळ्या दृष्टीने बघण्याचे आवाहन करत आहोत. त्यात कदाचित जुने वारसा-वृक्ष असतील, स्थानिक प्रजाती असतील, आगळे-वेगळे सौंदर्य असेल किंवा त्यांचे काही सांस्कृतिक माहात्म्य असेल.
उपक्रमाविषयी2026 चा उपक्रम
30 सप्टेंबर 2026
मुदतीपूर्वी नामांकन करा.
15 ऑक्टोबर 2026
मतदानासाठी काही निवडक वृक्षांची यादी या संकेतस्थळावर उपलब्ध होईल.
15 ऑक्टोबर –15 डिसेंबर 2026
निवडक वृक्षांची यादी पहा आणि आवडत्या वृक्षांना मत द्या.
31 डिसेंबर 2026 पूर्वी
“पुणे ट्री ऑफ द इयर”ची अंतिम निवड जाहीर होईल.
पुण्याला वैशिष्ट ओळख देणाऱ्या सुंदर आणि भव्य वृक्षांकडे लक्ष द्या.
या झाडांचे फोटो, माहिती आणि ठिकाण आम्हांला पाठवा.
यात सहभागी होऊन पुण्याला त्याच्या वैभवाची नव्याने ओळख करून देण्यात मदत करा.
हे कसे चालते
एखाद्या उल्लेखनीय झाडाची माहिती (ठिकाण, छायाचित्रे आणि त्याची वैशिष्ट्ये) आम्हांला पाठवा.
निवडक वृक्षांची यादी तयार करण्यापूर्वी नामांकनांची पूर्णता, सुसंगतता आणि प्राथमिक अचूकता तपासली जाईल.
पुण्यातील नागरिक निवडक झाडांची वर्णने वाचून आवडलेल्या झाडाला मत देतील.
अंतिम यादीतील सर्व झाडांचे वर्णन आणि छायाचित्रे उपलब्ध होतील.
विशेष झाडाबद्दल ..पुण्याचे वृक्ष
उल्लेखनीय झाडे ही अनेकदा जुनी आणि ऐतिहासिक वारसा असलेली झाडे असतात, त्यांच्यामध्ये अनेक आठवणी सामावलेल्या असतात. ती पक्ष्या-प्राण्यांचा आधार असतात, एखाद्या परिसराचा इतिहास असू शकतात, लोक एकत्र येण्याचे ठिकाण असू शकतात किंवा सांस्कृतिक वारसा असू शकतात.
नामांकन मिळालेल्या या झाडांविषयी जाणून घ्या आणि त्यांच्या आसपास राहणाऱ्या लोकांसाठी ती का महत्त्वाची आहेत, हे समजून घ्या.
नामांकित वृक्ष पहासहभागी व्हा
त्याचे ठिकाण, छायाचित्रे आणि त्याबद्दलची माहिती पाठवा. तुमच्या नामांकनामुळे पुण्याला त्याच्या नैसर्गिक वैभवाची माहिती देण्यात मदत होते.