पर्यावरणीय मूल्य
जैवविविधता, अधिवास, सावली, तापमानाचे नियंत्रण, मातीचे आरोग्य किंवा व्यापक शहरी परिसंस्थेतील योगदान.

हे कसे चालते
'पुणे ट्री ऑफ द इयर' नागरिकांना वैशिष्ट्यपूर्ण झाडांकडे लक्ष देण्यास, त्यांची नोंद करण्यास आणि त्यांचा उत्सव साजरा करण्यास आमंत्रित करत आहे. ही प्रक्रिया सोपी, पारदर्शक आणि सगळ्यांच्या सहभागाला प्रोत्साहन देणारी आहे.
नामांकन कराप्रक्रिया
प्रत्येक टप्प्याचा उद्देश पुण्यातील झाडांबद्दल लोकांना अधिकाधिक माहिती मिळणे आणि त्या झाडांचे पर्यावरणीय व सामाजिक मूल्य अधोरेखित करणे हा आहे.
एखाद्या उल्लेखनीय झाडाची माहिती (ठिकाण, छायाचित्रे आणि त्याची वैशिष्ट्ये) आम्हांला पाठवा.
निवडक वृक्षांची यादी तयार करण्यापूर्वी नामांकनांची पूर्णता, सुसंगतता आणि प्राथमिक अचूकता तपासली जाईल.
पुण्यातील नागरिक निवडक झाडांची वर्णने वाचून आवडलेल्या झाडाला मत देतील.
अंतिम यादीतील सर्व झाडांचे वर्णन आणि छायाचित्रे उपलब्ध होतील.
नामांकनाची तयारी
नामांकन प्रभावी असेल तर इतरांना झाड समजून घेण्यात, शोधण्यात आणि त्याची माहिती जाणून घेण्यात रस वाटू लागतो.
नामांकन पृष्ठ उघडाझाड कशामुळे उल्लेखनीय ठरते?
नामांकनासाठी सर्व निकष पूर्ण करणे आवश्यक नाही. एखादी आगळीवेगळी आठवण, काही वेगळी बाब किंवा समाजाशी असलेला घट्ट संबंधही पुरेसा असू शकतो.
जैवविविधता, अधिवास, सावली, तापमानाचे नियंत्रण, मातीचे आरोग्य किंवा व्यापक शहरी परिसंस्थेतील योगदान.
परिसराचा इतिहास, स्थानिक परंपरा, आठवणी किंवा महत्त्वाच्या घटनांशी असलेला संबंध.
झाड किती जुने आहे, किती दुर्मिळ आहे किंवा त्याची काही वैशिष्ट्ये, सौंदर्य.
लोक झाडाशी कसे जोडले गेले आहेत, झाडाखाली एकत्र जमतात का किंवा त्याच्या काही आठवणी सांगतात का इ.
पडताळणी आणि यादी
आयोजक प्रत्येक नामांकनाची पडताळणी करतात. त्यात सुसंगतता आणि स्पष्टता आहे का ते बघतात.
शक्य असल्यास, झाडाची प्रजाती, ठिकाण आणि माहिती यांसारख्या मूलभूत माहितीची पडताळणी केली जाऊ शकते. स्पष्टीकरणासाठी किंवा अधिक चांगल्या छायाचित्रांसाठी तुमच्याशी संपर्कही साधला जाऊ शकतो.
नंतर निवडक झाडांची यादी करून ती लोकांना मतदानासाठी खुली करण्यात येते. एखादे झाड यादीत आले याचा अर्थ “त्याला वारसा-वृक्ष म्हणून जाहीर करण्यात आले” किंवा “कायद्याने संरक्षण मिळाले”, असा होत नाही.
सहभागी होताना
खासगी जागेत जाताना परवानगी घेऊ या.
छायाचित्र घेताना झाड तोडणे, फांदी तोडणे, झाडावर चढणे इ. टाळू या.
जिथे सार्वजनिक प्रवेशामुळे झाड किंवा अधिवास धोक्यात येऊ शकतो, अशा ठिकाणांची माहिती मर्यादित असावी.
तथ्ये, अंदाज आणि ऐकीव बातम्या यांच्यात स्पष्टपणे फरक करू या.
एखादे उल्लेखनीय झाड तुम्हांला माहीत आहे?