पुणे ट्री ऑफ द इयर

आपल्या शहराला ओळख देणाऱ्या वृक्षांचा गौरव

'पुणे ट्री ऑफ द इयर' हा नागरिकांच्या पुढाकाराने सुरू केलेला एक उपक्रम आहे. याद्वारे पर्यावरणीय मूल्य, सांस्कृतिक महत्त्व, सौंदर्य अशा विविध गोष्टी आपल्याला देणाऱ्या वृक्षांचा गौरव होणार आहे.30 सप्टेंबर 2026 पूर्वी वृक्षांचे नामांकन करा. निवडक वृक्षांची यादी 15 ऑक्टोबरपासून मतदानासाठी उपलब्ध होईल. 15 डिसेंबरपर्यंत मतदान खुले असेल आणि लोकांच्या मतांद्वारे निवडलेल्या वृक्षांची अंतिम यादी 31 डिसेंबर 2026 पर्यंत जाहीर होईल.

उपक्रमाविषयी

नैसर्गिक वारशाचा सन्मान

झाडे फक्त परिसराचा भाग नसतात. ती तापमान कमी ठेवतात, पक्षी व कीटकांना आधार देतात, हवेची गुणवत्ता सुधारतात, कार्बन साठवून ठेवतात आणि जिथे लोक एकत्र येऊ शकतील अशी विसाव्याची ठिकाणं असतात.

हा उपक्रम पुणे शहरातील उल्लेखनीय वृक्षांचा शोध घेण्यासाठी, त्यांची नोंद करण्यासाठी आणि त्यांचा गौरव करण्यासाठी आहे. यामध्ये जुने वारसा-वृक्ष किंवा दुर्मिळ प्रजातीचे वेगळेच झाड किंवा वर्षानुवर्षे पूजा होणारे सांस्कृतिक महत्त्वाचे झाड किंवा परिसरातील महत्त्वाच्या खुणा असलेले वृक्ष असे विविध महत्त्वाचे वृक्ष असतील.

आमचा उद्देश

आदरभाव, ज्ञान आणि जबाबदारीची जाणीव वाढविणे

झाडांचे महत्त्व जाणून त्यांच्याकडे वेगळ्या दृष्टीने बघू लागलो, की मग आपले झाडांशी नाते जडते आणि आपण निसर्गाशी जोडले जातो.

01

शोध

आपल्या आजूबाजूच्या झाडांची दखल घेऊन नोंद ठेवण्यासाठी

02

गौरव

पुण्याची ओळख, परिसंस्था आणि वारसा समृद्ध करणाऱ्या वृक्षांशी मैत्री करण्यासाठी

03

शिक्षण

झाडांच्या प्रजाती, अधिवास आणि त्याच्या निगराणीची माहिती होण्यासाठी

04

संरक्षण

वृक्षांच्या संवर्धन आणि संरक्षणाचे महत्त्व वाटण्यासाठी

हे कसे चालते

नामांकनापासून ते अंतिम यादीपर्यंत

नागरिक स्वत: माहिती देतील आणि नंतर मतही देतील. संपूर्ण प्रक्रिया पारदर्शी आहे.

  1. 1

    नामांकन

    झाडाचे ठिकाण, फोटो आणि वर्णन पाठवा.

  2. 2

    पडताळणी

    नामांकन केलेल्या झाडांची व्यवस्थित माहिती आहे ना ते बघून निवडक झाडांची यादी तयार केली जाईल.

  3. 3

    मतदान

    निवडक यादीतील वृक्ष पाहून नागरिक त्यांना मत देतील.

  4. 4

    गौरव

    अंतिम निवड झालेल्या आणि यादीतल्या सगळ्याच झाडांशी आपण जोडले जाऊ.

आमची पद्धत

आत्मीयता आणि विश्वासार्हता

सर्वसमावेशकता

सर्व नागरिक यात सहभागी होऊ शकतात.

परिसंस्थांबद्दल आदर

झाडांबद्दल सगळ्यांना माहिती झाल्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारची हानी होणार नाही याची आपण दक्षता घ्यायची आहे.

अचूक माहिती

झाडाचे नाव, वर्णन, ठिकाण, फोटो ही माहिती बरोबर आहे ना याची खात्री करून मग पाठवायची आहे.

सामुदायिक जबाबदारी

झाडांची दखल घेऊन त्यांचा गौरव केल्यामुळे त्यांच्याशी नाते दृढ होऊन त्यांचे रक्षण करण्याची जबाबदारी वाढणार आहे.

उपक्रमात सहभागी व्हा

उल्लेखनीय झाडे बरीच असतात. आपण त्या दृष्टीने आजूबाजूला बघू या.

आवडत्या झाडांबद्दल अवश्य सांगा