पुणे ट्री ऑफ द इयर

उल्लेखनीय वृक्षाचे नामांकन करा

पुण्यातील वैशिष्ट्यपूर्ण झाडे शोधण्यात आणि त्यांची दखल घेण्यात आम्हांला मदत करा. त्या झाडाचे ठिकाण, छायाचित्रे आणि ते झाड का खास आहे, हे आम्हांला सांगा.

नामांकन करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०२६ आहे.कृपया मुदत संपण्यापूर्वी गुगल फॉर्म (Google Form) भरा.

सुरुवात करण्यापूर्वी

झाडाच्या नामांकनाची तयारी करा

नामांकन फॉर्म गुगल फॉर्म्समध्ये सुरक्षितपणे उघडण्याची व्यवस्था केली आहे. कारण यात छायाचित्रे अपलोड करण्याचे प्रश्न आहेत.

  • झाडाचे ठिकाण किंवा गुगल मॅप्सची (Google Maps) लिंक
  • झाडाचे नाव किंवा प्रजाती (माहीत असल्यास)
  • त्या झाडात काय विशेष आहे, त्याचे थोडक्यात वर्णन
  • झाडाची स्पष्ट छायाचित्रे
नामांकन फॉर्म उघडा

हा फॉर्म ब्राउझरच्या नवीन टॅबमध्ये उघडेल.

छायाचित्रांबाबत

झाडाबाबत विशेष काय आहे ते दाखवा

०१

संपूर्ण झाडाचे छायाचित्र

झाडाचा विस्तार आणि खोड यांसह संपूर्ण झाड दिसेल अशा प्रकारे छायाचित्र काढा.

०२

तपशील आणि परिसर

झाडाची वैशिष्ट्ये दाखविणारे जवळून काढलेले छायाचित्र किंवा झाडाचा त्याच्या परिसराशी असलेला संबंध दाखविणारे छायाचित्र द्या.